वर्षभरात गॅस सिलिंडर २४१ रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:17+5:302021-07-22T04:16:17+5:30

सचिन भोसले : लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. त्यात केंद्रानेही घरगुती गॅस ...

Gas cylinders increased by Rs 241 during the year | वर्षभरात गॅस सिलिंडर २४१ रुपयांनी वाढले

वर्षभरात गॅस सिलिंडर २४१ रुपयांनी वाढले

Next

सचिन भोसले : लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. त्यात केंद्रानेही घरगुती गॅस सिलिंडरचे दर वर्षभरात तब्बल २४१ रुपयांनी दर वाढविले आहेत. मागील वर्षी जुलै २०२० मध्ये ५९७ रुपये इतका प्रति सिलिंडरमागे दर होता. आज हाच दर ८३७.५० रुपये इतका झाला आहे. मात्र, बँक खात्यात अनुदान काही जमा केलेली नाही. विशेष म्हणजे याबाबत स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळे गोरगरिबांने जगायचं कसे? असाच प्रश्न तयार झाला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ मनुष्यहानी झाली नाही तर संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले. त्यामुळे ८३७.५० रुपये मोजून घरगुती सिलिंडर घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यात सर्वसामान्यांचा आधार म्हणून किमान एका सिलिंडरवर १०० ते १२५ रुपयांपर्यंतची सबसिडी (अनुदान) गॅस धारकाला मिळत होते. मात्र, तेही जुलै २०२० पासून हा आधारही जवळपास बंद झाला आहे. शहरातील नागरिकांना एका बाजूने गॅस सिलिंडर परवडत नाही. दुसऱ्या बाजूने घरी चूलही पेटविता येत नाही. कारण, शहरात लाकडे अथवा जळण मिळत नाही. कुटुंब प्रमुखाच्या पगारात हा वाढलेला गॅस सिलिंडरचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सबसिडीही बंद केल्यामुळे गॅसधारक हवालदिल झाले आहेत.

महिना सिलिंडरचे दर : अनुदान किती मिळाले..

जुलै २०२० ५९७ : शून्य

ऑगस्ट २०२० ५९७ : शून्य

सप्टेंबर २०२० ५९७ : शून्य

ऑक्टोबर २०२० ५९७ : शून्य

नोव्हेंबर २०२० ६४७ : शून्य

डिसेंबर २०२० ६४७ : शून्य

जानेवारी २०२१ - ७२२ : शून्य

फेब्रुवारी २०२१ - ७७२ : शून्य

मार्च २०२१ - ७९७ : शून्य

एप्रिल २०२१ - ८२२ : शून्य

मे २०२१ - ८२२ : शून्य

जून २०२१ - ८३४ : शून्य

जुलै २०२१ - ८३७.५० : शून्य

शहरात चूलही पेटविता येत नाही

एका बाजूने सरकार सिलिंडरचे दर वाढवित असताना त्यावरील सबसिडीही देत नाहीत. त्यामुळे कुटुंबाचे अर्थचक्र बिघडले आहे. शहरात आम्ही चूल पेटवू शकत नाही. त्यामुळे उसनवारी करून सिलिंडर घेण्याशिवाय पर्याय नाही.

- अनुजा साळवी, गृहिणी, शाहुपुरी, कोल्हापूर

कोरोनाने केवळ नोकऱ्या घालविल्या नाही तर आमच्या तोंडाचा घास पळविला आहे. शहरात राहून चूल पेटवू शकत नाही. सिलिंडरशिवाय पर्याय नाही. उधार उसनावारी करून ते घेण्याशिवाय काहीच करू शकत नाही. सरकारने ही दरवाढ कमी करून दिलासा द्यावा.

-नम्रता साळोखे, शिवाजी पेठ, कोल्हापूर

-

Web Title: Gas cylinders increased by Rs 241 during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.