किरकोळ बिघाडानंतर गॅस दाहिनी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 PM2020-10-03T17:00:36+5:302020-10-03T17:01:51+5:30
पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता.
कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा स्मशानभूमीत बेड कमी पडू लागले. परिणामी येथून मृतदेह इतर स्मशानभूमीत दहनसाठी पाठवावी लागली. या दरम्यान नव्याने बसविण्यात आलेल्या गॅस दाहिनीची सर्व कामे पूर्ण करून सुरू करण्यात आली.
गॅस दाहिनीमध्ये कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे दहन करण्यात येत होते. त्यामुळे स्मशानभूमीतील अतिरिक्त ताण कमी झाला होता. मात्र गेल्या आठ दिवसांत यामध्ये बिघाड झाल्यामुळे दाहिनी बंद होती. सध्या दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
शेणीसाठी आणखी सहकार्याची गरज
शहरासह ग्रामीण भागातील जनतेने स्मशानभूमीसाठी शेणी दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सात लाखांहून अधिक शेणी जमा झाल्या. यापैकी चार लाख वापरले असून तीन लाख शेणी शिल्लक आहेत. एका मृतदेहाला सहाशे शेणी लागतात. मृतदेह वाढल्यामुळे आठवड्याला सुमारे २० हजार शेणींचा वापर झाला. सध्या उपलब्ध असलेल्या शेणी नोव्हेंबरपर्यंत पुरतील इतक्या आहेत. कोरोनाची साथ अद्यापि १०० टक्के आटोक्यात आलेली नाही. भविष्याचा विचार करता पुन्हा शेणींचा तुटवडा होऊ शकतो. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांनी शेणीदान उपक्रम सुरू ठेवणे गरजेचे आहे.