भाटवाडीत गॅस्ट्रोची साथ

By Admin | Published: March 23, 2015 12:49 AM2015-03-23T00:49:12+5:302015-03-23T00:50:42+5:30

८० जणांना लागण : साथ आटोक्यात आणण्यात यश; आरोग्य विभागाचा दावा

Gatrochi with Bhatwadi | भाटवाडीत गॅस्ट्रोची साथ

भाटवाडीत गॅस्ट्रोची साथ

googlenewsNext

वाटेगाव : भाटवाडी (ता. वाळवा) येथे ७० ते ८० ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. उलट्या व जुलाबाचा जास्त त्रास होणाऱ्या २५ रुग्णांवर रविवारी खासगी व शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचार करण्यात आल्याने ही साथ आटोक्यात आली आहे. ज्या रुग्णांना कमी त्रास आहे, त्यांना गोळ्या व इंजेक्शन देण्यात आले.शनिवारी सकाळपासून भाटवाडीतील ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. याबाबतची माहिती ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेर्ले व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांना दिली. यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक सुतार, नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जे. डी. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. ज्यांना उलटी व जुलाबाचा त्रास होत आहे,



शनिवारी व रविवारी भाटवाडी येथील ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. आरोग्य विभागाने तत्काळ गावास भेट देऊन रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. ग्रामस्थांना पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी तपासणीसाठी इस्लामपूरला पाठविण्यात आले आहे. पाण्यामध्ये टी.सी.एल.चे प्रमाण जास्त झाले तरीही असा त्रास होऊ शकतो. या पाण्याचा तपासणी अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.
- डॉ. अशोक सुतार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वाळवा पं. स.

Web Title: Gatrochi with Bhatwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.