टोप-संभापूर परिसरात गवा, ग्रामस्थ मागे लागल्याने बिथरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:19 PM2022-07-04T12:19:10+5:302022-07-04T12:19:32+5:30

गवा टोप येथील मानवी वस्तीत घुसला. यानंतर ग्रामस्थ गव्याच्या मागे लागल्याने तो बिथरला.

Gaur in Top Sambhapur area kolhapur district | टोप-संभापूर परिसरात गवा, ग्रामस्थ मागे लागल्याने बिथरला

टोप-संभापूर परिसरात गवा, ग्रामस्थ मागे लागल्याने बिथरला

googlenewsNext

शिरोली : टोप-संभापूर येथील चिन्मय गणाधीश ट्रस्टच्या बंदीस्त आवारात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गवारेडा आता. या गव्याला अधिवासात सोडण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू टिम दिवसभर प्रयत्न करत होती. दरम्यान, वन विभागाने रात्री दहाच्या सुमारास या गव्याला महामार्ग ओलांडून सादळे-मादळेच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु गवा टोप येथील मानवी वस्तीत घुसला. यानंतर ग्रामस्थ गव्याच्या मागे लागल्याने तो बिथरला.

गेले काही महिन्यांपासून सादळे-मादळे, कासारवाडी, गिरोली, मनपाडळे, शिये, भुये परिसरात गवा फिरत होता. हा गवा शनिवारी वाठार, शिगाव पेठवडगाव, संभापूरमार्गे येत असताना काही हुल्लडबाज तरुणांनी त्याला दगड मारून हुसकावले. त्यानंतर टोप गंधर्व पार्क येथील चिन्मय गणाधीश ट्रस्टच्या आवारात गवा शिरला. येथील आमराईत दिवसभर हा गवा फिरत होता. गवा टोप संभापूर येथे आल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजले असता वनविभागाचे अधिकारी आर. एस. कांबळे आणि रेस्क्यू टीमचे सुमारे २५ अधिकारी व कर्मचारी टोपमध्ये सकाळी नऊघ्या सुमारास दाखल झाले. पाठोपाठ शिरोली पोलीसही आले.

संपूर्ण परिसर बंदिस्त केला. गवा पाहण्यासाठी आलेल्या लोकांना हटवले. दिवसभर गवा वनराईतच होता. दिवसभर पावसात वनक्षेत्रपाल अधिकारी आर. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग हातकणंगलेचे साताप्पा जाधव, करवीरचे वनपाल विजय पाटील, कृष्णात दळवी, पुंडलिक खाडे (वनसेवक), तर रेस्क्यूचे प्रदीप सुतार, देवेंद्र भोसले, तेजस जाधव, अमोल चव्हाण, राकेश शिक्रे, सचिन निकम, शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस कर्मचारी दाखल झाले. वनविभागाकडून विशेष मोहीम राबवून गव्याला अधिवासात घालवण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Gaur in Top Sambhapur area kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.