साखर कारखान्यांचा गौरव--देशातील साखर कारखान्यांना विशेष कार्याबद्दल पुरस्कार
By Admin | Published: September 16, 2014 11:04 PM2014-09-16T23:04:48+5:302014-09-16T23:58:10+5:30
नॅशनल शुगर फेडरेशनतर्फे पुरस्कार : जवाहर, शाहू, दत्त, वारणेचा समावेश
कोल्हापूर : नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर फॅक्टरीज या नवी दिल्ली येथील संस्थेच्यावतीने देशातील साखर कारखान्यांना विशेष कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखाना, कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखाना व वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘जवाहर’ला उत्कृष्ट
ऊस विकास पुरस्कार
इचलकरंजी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास विभागात देशात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. तो फेडरेशनचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विलास गाताडे यांना दिला.
यावेळी नॅशनल शुगर फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित कोरे, संचालक शिवाजीराव पाटील, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, गुजरात फेडरेशनचे मनीषभाई पटेल, हरियाणा फेडरेशनचे अजय शर्मा, पंजाब फेडरेशनचे संदीप सिंग, उत्तर प्रदेशचे चंद्रशेखर सिंग, ‘इस्मा’चे संचालक अविनाश वर्मा, आदी उपस्थित होते.
‘शाहू’ला निर्यातीबाबतचा तृतीय क्रमांकाचा कार्यक्षमता पुरस्कार
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला सन २०१३-१४ या हंगामामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल जाहीर केलेला तृतीय क्रमांकाचा कार्यक्षमता पुरस्कार कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे, ज्येष्ठ संचालक आमदार वीरकुमार पाटील, संचालक यशवंत जयवंत माने, युवराज अर्जुन पाटील, आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी अजित कुलकर्णी, मार्केटिंग आॅफिसर मारुती पाटील, मार्केटिंग असिस्टंट मानसिंग खराडे, गोडावून कीपर सुरेश मगदूम यांनी स्वीकारला.
‘दत्त’ शिरोळ कारखान्यास
उत्कृष्ट कारखाना पुरस्कार
शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागामध्ये उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक-संचालक आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
वारणा कारखान्यास साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार
वारणानगर : सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दलचा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंदराव जाधव, राजाराम पाटील, रावसाहेब भोसले, सुरेश पाटील, पांडुरंग पाटील, सुभाष जाधव, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व्ही. एस. चव्हाण, असिस्टंट मॅनेजर जगन्नाथ चरापले यांनी स्वीकारला.
नवी दिल्ली येथील नॅशनल शुगर फेडरेशनच्यावतीने जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास विभागातील पारितोषिक विलास गाताडे यांना देताना फेडरेशनचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे. यावेळी फेडरेशनचे संचालक शिवाजीराव पाटील. दुसऱ्या छायाचित्रात पुरस्कार स्वीकारताना शाहू कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे, ज्येष्ठ संचालक आमदार वीरकुमार पाटील, संचालक यशवंत जयवंत माने. तिसऱ्या छायाचित्रात सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार स्वीकारताना श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील. शेजारी मयूरभाई नारेचणिया, उपस्थित होते. चौथ्या छायाचित्रात सर्वाधिक साखर निर्यातीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना वारणा कारखान्याचे संचालक गोविंदराव जाधव, रावसाहेब भोसले, सुभाष जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.