श्री आदिनाथ बॅँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:10+5:302021-09-24T04:28:10+5:30
इचलकरंजी : येथील श्री आदिनाथ बॅँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने जैन सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात खेळीमेळीत पार ...
इचलकरंजी : येथील श्री आदिनाथ बॅँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने जैन सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन व तीर्थंकर आदिनाथ भगवान प्रतिमेचे पूजन केले. उपाध्यक्ष बाळासाहेब केटकाळे यांनी श्रद्धांजली ठराव मांडून अहवाल सालातील मृत व्यक्ती व सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष सुभाष काडाप्पा यांनी आर्थिक सालाचे अहवाल वाचन केले. तसेच कोरोना काळातील बॅँकिंग व बॅँकेच्या कामगिरीची माहिती दिली. बॅँकेने एनपीए शून्य टक्के राखला आहे. रिझर्व्ह बॅँकेने विविध परिपत्रकाद्वारे नवनवीन संकल्पना आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा भाग म्हणून जून २०२० पासून बॅँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या कलम ५६ मध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बॅँकेच्या वाटचालीत संचालक, सभासद व सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे सहकार्य लाभले आहे.
नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. चौगुले यांनी केले. रवींद्रकुमार देवमोरे यांनी सभासदांच्या सूचना व शंकांना समाधानकारक उत्तरे दिली. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी स्वागत केले. सभेसाठी कुंतीलाल पाटणी, बापूसाहेब जमदाडे, डॉ. पारीसा बडबडे, अभयकुमार मगदूम, मंगल देवमोरे, पद्मावती लडगे, शंकर हजारे, गुरुनाथ हेरवाडे, सुचित हेरवाडे, जिनेंद्र खोत, मधुकर मणेरे, आदींसह सभासद उपस्थित होते. चंद्रकांत मगदूम यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२३०९२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील श्री आदिनाथ बॅँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीत पार पडली. अध्यक्ष सुभाष काडाप्पा यांनी आर्थिक सालाचे अहवाल वाचन केले.