संस्थांच्या सर्वसाधारण सभांना ब्रेक लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:27+5:302021-02-23T04:39:27+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या सभांना पुन्हा ब्रेक लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सभांना ...
कोल्हापूर : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या सभांना पुन्हा ब्रेक लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सभांना परवानगी नाकारत आहे. त्यामुळे मार्चअखेर सभा कशा घ्यायच्या, असा पेच संस्थांसमोर आहे.
सहकरी संस्थांचे आर्थिक वर्ष हे मार्च असते. मार्चअखेरचा ताळेबंद निश्चित करून सप्टेंबरअखेर सभासदांची वार्षिक सवर्सधारण सभा घ्यावी, असा सहकार विभागाचा नियम आहे. मार्च २०२० अखेर संस्थांचे कामकाज पुर्ण झाले, मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने सभा घेता आल्या नाहीत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळे सभा घेता आल्या नाहीत. राज्य शासनाने मार्च २०२१ अखेर सभा घेण्याची संस्थांना मुभा दिली. नोव्हेंबरनंतर कोरोना कमी होत गेल्याने सभा घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. अहवालांची छपाई करून जानेवारी महिन्यापासून सभा घेण्यास सुरुवात झाली. ‘गोकुळ’, जिल्हा बँक या शिखर संस्थांच्या सभा झाल्या. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने दक्षता घेतली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा, समारंभावर निर्बंध आणल्याने जिल्हा प्रशासनाने संस्थांच्या वार्षिक सभांनाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मार्चअखेर सभा कशा घ्यायच्या, असा पेच संस्थांसमोर आहे.