भावनांची सरमिसळ मांडणारा इशारो इशारो में
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:27+5:302021-03-25T04:23:27+5:30
कोल्हापूर : विनोद, रोमान्स आणि शब्देविण संवादूची अनुभूती देणारे इशारो इशारो में म्हणजे भावनांची सरमिसळ आहे. एक बोलका आणि ...
कोल्हापूर : विनोद, रोमान्स आणि शब्देविण संवादूची अनुभूती देणारे इशारो इशारो में म्हणजे भावनांची सरमिसळ आहे. एक बोलका आणि अबोल या दोन जिवांच्या प्रेमाची गोष्ट मांडणाऱ्या या नाटकाचा प्रयोग पहिल्यांदाच कोल्हापुरात शुक्रवारी (दि. २ एप्रिल) रोजी होत आहे, अशी माहिती अभिनेता सागर कारंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे नाटक दौऱ्यावर येत असून, केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता प्रयोग होईल. तसेच ३ एप्रिलला सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिर व ४ एप्रिलला साताऱ्यातील शाहू कलामंदिरमध्ये नाटक सादर होणार आहे. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सरगम क्रिएशन्स निर्मित या नाटकाची मूळ संकल्पना व दिग्दर्शन जय कापडिया यांचे आहे, तर मूळ लेखक प्रयाग दवे असून, मराठीत स्वप्निल जाधव यांनी रूपांतर केले आहे. संगीतकार राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केले असून, अजय पुजारे यांचे नेपथ्य आहे. अजय कासुर्डे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. यात सागर कारंडे यांच्यासोबतच उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावणे, अव्यान मेहता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तरी रसिकांनी नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस गिरीश महाजन, मंदार काणे, स्वप्निल माने आदी उपस्थित होते.
---
फोटो नं २४०३२०२१-कोल-इशारो इशारो में
--