एकाच रुग्णालयातून दोन्ही लस घ्या : अक्षय बाफना यांनी दिला सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 10:52 AM2021-03-05T10:52:41+5:302021-03-05T10:57:14+5:30
Corona vaccine Kolhapur -पहिल्यावेळी ज्या कंपनीची कोरोना लस ज्या रुग्णालयातून घेतली आहे, त्याच कंपनीची लसही त्याच रुग्णालयातून घ्यावी, असा सल्ला डॉ. अक्षय बाफना यांनी उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिला.
कोल्हापूर : पहिल्यावेळी ज्या कंपनीची कोरोना लस ज्या रुग्णालयातून घेतली आहे, त्याच कंपनीची लसही त्याच रुग्णालयातून घ्यावी, असा सल्ला डॉ. अक्षय बाफना यांनी उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिला.
येथील कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे शिवाजीराव देसाई सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना लसीकरणाबाबतच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना लसीकरण हे सध्या ६० वर्षावरील आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त लोकांसाठी उपलब्ध आहे.
या व्यक्तींनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेतले पाहिजे. लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करावी. लसीकरणासाठी जाताना पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र सोबत घेऊन जाणे अनिवार्य असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कोल्हापूर चेंबरह्णचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव वैभव सावर्डेकर, धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनिल धडाम, संभाजीराव पोवार, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, जयंत गोयानी उपस्थित होते. अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत केले. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.