सीए मिळतात, पण अकाऊंटंट नाही

By admin | Published: June 14, 2017 01:28 AM2017-06-14T01:28:46+5:302017-06-14T01:28:46+5:30

सध्या नागपुरात जवळपास १० हजार अकाऊंटंट कार्यरत असून जीएसटी लागू झाल्यानंतर २५ हजारांपेक्षा जास्त अकाऊंटंटची गरज राहील.

Get the CA, but there is no accountant | सीए मिळतात, पण अकाऊंटंट नाही

सीए मिळतात, पण अकाऊंटंट नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेमार्फत सुरू असलेल्या नगरोत्थान योजनेतील अपूर्ण कामे पंधरा दिवसांत पूर्ण करावीत, असे आदेश महापौर हसिना फरास यांनी सोमवारी (दि. १२) झालेल्या बैठकीत संबंधित ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत फुलेवाडी रिंग रोडवर ठेकेदारास मारहाण झाल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी का केली नाही? अशी विचारणा गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली; परंतु तिची दखल घेण्यात आली नाही.
गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरोत्थान योजनेमधून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार ताराराणी सभागृहात पदाधिकारी, अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निर्माण कन्स्ट्रक्शनच्या विनय जोशी यांनी त्यांच्याकडे मंजूर असलेल्या कामापैकी ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करीत असल्याचे सांगितले.
आर. ई. इन्फ्राच्या अविनाश कुलकर्र्णी यांनी त्यांच्या पॅकेजमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या उर्वरित
२० टक्के कामे पावसाळा संपल्यानंतर करणार असल्याचे सांगितले.
आर. ई. इन्फ्रा कंपनीने दुधाळीतील रस्त्यांवर तीन फूट चॅनेलची भिंत उभी केली होती, ती फोडण्यात आली. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कन्सल्टंट, ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करा. रामानंदनगर येथील नाल्याचे काम चांगले झालेले नाही. गटारीचे आउटलेट नाल्याला जोडलेले नाही. स्टॉर्मवॉटरचे काम करताना नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराकडून गाळ काढून घ्या, अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी केली.
फुलेवाडी रिंग रोड ते साईबाबा मंदिर कळंबा या पाच किलोमीटर रस्त्याचे काम व्हीयूबी ही कंपनी करीत आहे. थेट पाईपलाईनचे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदला आहे. तो मंजूर एस्टिमेटप्रमाणेच दोन्ही बाजूंनी केला जाईल. यामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही, असा खुलासा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केला.
बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, शिक्षण सभापती अजिंक्य चव्हाण, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, प्रभाग सभापती अफजल पीरजादे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, नगरसेविका माधुरी लाड, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, कन्सल्टंट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


...तर ‘जशास तसे उत्तर’ देऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : फुलेवाडी जकात नाका ते कळंबा साई मंदिर या नगरोत्थान योजनेतून सुुरू असलेल्या पाच किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले पाहिजे. या कामामध्ये जर कोणी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दहशतीचा वापर करत असेल तर त्यास ‘जशास तसे उत्तर’ दिले जाईल, असा इशारा महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल माने, वनिता देठे, अभिजित चव्हाण, प्रतीक्षा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी दिला.
रस्त्याच्या कामावरून होत असलेल्या स्टंटबाजीचा निषेध करून या नगरसेवकांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, फुलेवाडी रिंगरोड हा फक्त एका प्रभागाचा प्रश्न नसून तो संपूर्ण उपनगराचा आहे. तो पूर्ण व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत; परंतु फक्त श्रेयवादातून स्वयंघोषित नगरसेवकाने केलेल्या स्टंटबाजीमुळे व विकासकामांना कायम आडकाठी करणाऱ्या त्यांच्या नेत्यामुळेच हे काम थांबले आहे. ‘स्वयंघोषित कार्यकर्त्या’ने फक्त त्यांच्या प्रभागातीलच काम झाले नसल्याचा दावा केला आहे. तो चुकीचा आहे. वनिता देठे यांच्या प्रभागातील रस्तासुद्धा झालेला नाही. प्रतीक्षा पाटील यांच्या प्रभागातील कामेही अर्धवट आहेत.
अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यामुळे तसेच त्यांच्या नेत्यांमुळे शहरातील अनेक विकासकामे रेंगाळली असून विकसक कंपन्या काम करण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे म्हणून अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Get the CA, but there is no accountant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.