रेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:43 PM2021-05-17T13:43:47+5:302021-05-17T13:46:00+5:30

CoronaVirus Collcator Kolhapur : कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

Get information from hospitals about the use of Remedesivir, instructions of Guardian Minister Satej Patil | रेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

रेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देरेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांनी रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रेमडेसिविरचा पुरवठा, प्राणवायूची सद्यस्थिती, पी. एस. ए. ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प याबाबत आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते. यावेळी पी. एस. ए. ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्नशील राहावे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चर प्रणित पुणे प्लॅटफॉर्म कोविड रिस्पॉन्सच्या मिशन प्राणवायू प्रकल्पाव्दारे कोल्हापूर जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. यातील इचलकरंजी, चंदगड व राधानगरीसाठी प्रत्येकी १०, संजय घोडावत विद्यापीठ रुग्णालयासाठी २० असे वापरले जाणार आहेत. सीपीआरसाठी ४ आणि महापालिका रुग्णालयासाठी १ बायपॅकही मिळाले आहे.

Web Title: Get information from hospitals about the use of Remedesivir, instructions of Guardian Minister Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.