‘दुनियादारी’तून बाहेर पडा

By admin | Published: December 31, 2016 12:17 AM2016-12-31T00:17:41+5:302016-12-31T00:17:41+5:30

इंद्रजित देशमुख : बिद्री येथे ‘बलशाली युवा हृदय संमेलन’ उत्साहात

Get out of 'worldly' | ‘दुनियादारी’तून बाहेर पडा

‘दुनियादारी’तून बाहेर पडा

Next

बोरवडे : युवक हा देशाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. महाविद्यालयीन जीवनात प्रत्येकक्षणी त्यांच्यात ऊर्जा, उत्साह व धडाडी असते. याच जोरावर तो भरारी घेण्यास उत्सुक असतो. काळ हा एकेरी मार्ग आहे. जीवनाची गती ओळखून प्रत्येक क्षणाच्या संधीचे सोने करण्यासाठी सर्व तरुणांनी कॉलेज कट्ट्यावरील दुनियादारीतून बाहेर पडावे, असा युवामंत्र जिल्हा प्
ारिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी दिला.
शिवम्, आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी, बिद्री साखर कारखाना व दूध साखर महाविद्यालय, बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने दुधसाखर महाविद्यालयात एकदिवसीय ‘बलशाली युवा हृदय संमेलन’ झाले. यावेळी ‘चला देश घडवूया’ या विषयावर ते बोलत होते.
कॉलेज कट्ट्यासंदर्भात बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, कॉलेज जीवनात प्रत्येक तरुणाला मैदान, ग्रंथालय, स्नेहसंमेलन व एन. एस. एस. अशा वेगवेगळ्या कट्ट्यातून जावे लागते; पण एनएसएस हा कट्टा आव्हानात्मक असतो. यामध्ये त्यांचे सामर्थ्य व कौशल्य गुण विकसित होतात. कॉलेज जीवनात अनेक मोहाचे क्षण येतात; पण त्याला बळी न पडता करिअरचा योग्य पर्याय निवडा.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात आवाजतज्ज्ञ निनाद काळे यांनी ‘आता कसंही नको ... छानच बोलूया’ या विषयावर मार्गदर्शन करताना जगण्याच्या कलेत ‘संवाद कला’ आत्मसात करण्याचा मंत्र दिला, तर करिअर मार्गदर्शन पल्लवी देसाई यांनी ‘यशस्वी करिअरकडे वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त माहितीचे स्रोत व प्रोफाईल बायोडाटा कसा विस्तारित केला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विज्ञान प्रदर्शनासाठी जपानला निवड झाल्याबद्दल शिक्षक आनंदराव चरापले, विद्यार्थी सचिंद्र जाधव, माणिक पाटील तसेच पीएच.डी. साठी निवड झाल्याबद्दल राहुल भासले यांचा सत्कार डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, सचिव एस. एस. चौगुले, सेक्रेटरी सर्जेराव किल्लेदार, बी. बी. पाटील, एम. जी कल्याणकर, राजेंद्र कावणेकर, उदय पाटील, के. डी. पाटील, कृष्णात ढवण, प्रवीण दाभोळे, धनाजी पाटील, प्रमोद तौंदकर, अरविंद नलवडे, सोमनाथ येरणाळकर, सुभाष जगताप उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. एल. राजगोळकर यांनी प्रास्ताविक, प्रा. डी. एन. पाटील यांनी स्वागत, तर प्रमोद तौंदकर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Get out of 'worldly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.