स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:17+5:302021-08-15T04:25:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून आगामी जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाचा झेंडा ...

Get ready to fly the flag over local self-government bodies | स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून आगामी जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक दिलीप पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलची शनिवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होत्या.

दिलीप पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि राष्ट्रवादी पक्षाचे ऋणानुबंध वेगळे असून येथील ऊर्जा घेऊनच राज्याचे राजकारण करता येते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी भक्कम झाली असून विरोधकांना कोल्हापूर स्टाईलने उत्तर देण्याचे काम महाराष्ट्रात फक्त मंत्री मुश्रीफच करत आहेत.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, विविध सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील घराघरांपर्यंत राष्ट्रवादीचा विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची बांधणी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, तालुका, विधानसभा व जिल्हा पातळीवर ३२ सेलच्या कार्यकारिणी तयार केल्या आहेत. सेलच्या माध्यमातून हजारो पदाधिकारी सक्रिय झाले असून आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दिसेल.

यावेेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रोहित पाटील, नितीन जांभळे, बाळासाहेब देशमुख, पंडितराव केणे आदी उपस्थित होते.

सेलची बांधणी राज्यात नंबर वन

सेलच्या कार्यकारिणीचा आढावा घेतल्यानंतर दिलीप पाटील म्हणाले, कोल्हापूरमध्ये विविध सेलच्या माध्यमातून केलेली बांधणी राज्यात नंबर वन आहे. आदर्श रेकॉर्ड कसे असावे, याचे उत्तम उदाहरण असून यासाठी ए. वाय. पाटील व अनिल साळोखे यांची मेहनत आहे.

फोटो ओळी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत निरीक्षक दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ए. वाय. पाटील, अनिल साळोखे, अमरसिंह माने आदी उपस्थित होते. (फाेटो-१४०८२०२१-कोल- एनसीपी) (छाया- आदित्य वेल्हाळ)

Web Title: Get ready to fly the flag over local self-government bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.