शेतकऱ्यांचा एल्गार पाहण्यासाठी सज्ज राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:51+5:302020-12-06T04:25:51+5:30
म्हाकवे : शेतकरी आणि सामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्याची वल्गना करणाऱ्या आघाडी सरकारने त्यांची थट्टा ...
म्हाकवे : शेतकरी आणि सामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्याची वल्गना करणाऱ्या आघाडी सरकारने त्यांची थट्टा सुरू केली आहे. वीज बिले माफ करण्याचा निर्णय नाही की प्रामाणिक कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०हजार देण्याची अंमलबजावणी नाही. त्यामुळे याबाबत महिनाभरात ठोस निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांचा एल्गार पाहण्यासाठी सज्ज राहा, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला. घाटगे यांच्या निर्णयाला शेतकऱ्यांनीही हात उंचावून आणि घोषणाबाजी करत पाठिंबा दर्शविला.
खडकेवाडा-हमिदवाडा (ता. कागल) येथील शिवारात जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नानासाहेब घाटगे होते.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, राज्यातील मंत्री वीज बिल, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान याबाबत विसंगत वक्तव्य करतात. त्यांचं बोलणं होतं, पण आमच्या शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा जीव जातो. केंद्राने निधी न दिल्यामुळे हे प्रलंबित असल्याचे सांगून वेळ मारणे चुकीचे आहे.
प्रास्ताविक संजय चौगुले (हमिदवाडा) यांनी केले. यावेळी दत्तामामा खराडे, प्रवीण चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली. सुनीलराज सूर्यवंशी, अनंत फर्नांडिस, प्रशांत घोरपडे, राजू पाटील, गुरुदास चौगुले, चंद्रकांत दंडवते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अभिजित घोरपडे यांनी आभार मानले.
चौकट.
तुम्ही ऊर बडवून घेऊ नका : काटे
कोणीही उठतो आणि शेतकरीरूपी मोडक्या कुपावरच पाय देतो. प्रामाणिक शेतकऱ्यांच्या योगदानातूनच जिल्हा बँक उर्जितावस्थेत आली आहे. त्यामुळे कोणीही ऊर बडवून घेऊ नयेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार परत न केल्यास आगामी वर्षात एकही शेतकरी पैसे भरणार नाही. परिणामी सेवा संस्थांसह जिल्हा बँकेचेही अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही काटे यांनी दिला.
कँप्शन १) खडकेवाडा येथील शिवार संवाद कार्यक्रमात बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे २) खडकेवाडा येथे शिवार संवाद कार्यक्रमादरम्यान समरजित घाटगे यांचा सत्कार करताना शेतकरी.
छाया : अमोल चौगुले, बेनिक्रे