कोरोना असला तरी रस्त्यावर उतरू : कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:42+5:302021-06-09T04:31:42+5:30
येथील तहसील कार्यालयासमोर आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन ...
येथील तहसील कार्यालयासमोर आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन दिले. घटनात्मकदृष्ट्या मागासवर्गीयांना पदोन्नतीचे आरक्षण रोस्टर आणि बिंदुनामावलीनुसार होते. महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय समाजावर मोठा अन्याय केला आहे, असे कांबळे यांनी सांगितले. या वेळी बी. आर. कांबळे, बाबासाहेब कागलकर, विनोद कांबळे, साताप्पा हेगडे, तानाजी सोनाळकर, अजित भोसले, मंजुनाथ वराळे, विद्याधर शिंदे, आनंदा सिद्धनेर्लीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण पूर्वरत ठेवावे यासाठी आज आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.