महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:04 PM2019-07-11T17:04:30+5:302019-07-11T17:06:16+5:30
परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी व इतर कार्यालयीन कामासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पंढरपूरच्या धर्तीवर निवासस्थान उभे करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोल्हापूर : परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी व इतर कार्यालयीन कामासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पंढरपूरच्या धर्तीवर निवासस्थान उभे करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन पाटील व किसान कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार शीतल मुळे यांना सादर करण्यात आले.
निवेदनातील मागण्या अशा, खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हेड कॉन्स्टेबल व साहाय्यक फौजदार यांना लवकर पदोन्नती द्यावी. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती पत्रे मिळावीत.
विविध आंदोलने, मोेर्चे, मेळावे, यात्रा, सर्व निवडणुका या निमित्ताने पोलिसांना २४ तास बंदोबस्त ठेवावा लागतो; यासाठी पंढरपूर शहरामध्ये पोलिसांसाठी निवासस्थान उभारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिसरामध्ये निवासस्थान उभे करावे. आंदोलनात राजेंद्र मोरे, सुनीता कांबरे, आसमान मोहिते, महेश जाधव, संतोष देसाई, आदी सहभागी झाले होते.