घानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हा, विठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:00 PM2019-08-31T15:00:39+5:302019-08-31T15:04:03+5:30

घानवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन तिघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.

Ghanwade clashes, crime against five, dispute over Vitthalai milk organization | घानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हा, विठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

घानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हा, विठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

Next
ठळक मुद्देघानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हाविठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

कोल्हापूर : घानवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन तिघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, दूध संस्थेतील गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन सभासदांच्यात वाद झाला. या वादातून लोखंडी गज आणि प्लॉस्टिक खुर्ची डोक्यात घातल्याने सतीश पाडुंरग शिंदे, गणेश बापू शिंदे, बबन दत्तू शिंदे (सर्व रा. चव्हाणवाडी, घानवडे) हे जखमी झाले.

या प्रकरणी संशयित शामराव कृष्णा गावडे, प्रकाश भिवाजी गावडे, कृष्णात शामराव गावडे (सर्व रा. चव्हाणवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तुकाराम ज्ञानू सावंत यांनी दिलेल्या फियार्दीनुसार सतीश पांडुरंग शिंदे, सूरज शिंदे (दोघेही रा. चव्हाणवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

संशयित दोघांनी लोखंडी गजाने मारहाण केल्याने तुकाराम सावंत आणि सदाशिव गोपाळ शिंदे जखमी झाल्याचे फियार्दीत म्हटले आहे. याप्रकरणी सतीश शिंदे आणि तुकाराम सावंत यांनी फिर्यादी दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Ghanwade clashes, crime against five, dispute over Vitthalai milk organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.