बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:25 AM2021-01-16T11:25:14+5:302021-01-16T11:27:04+5:30

Satej Gyanadeo Patilबोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. मुंबईतील मंत्रालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृहनिर्माण विभागासोबत बैठक घेतली. संबंधितांना सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.

Gharkul project in Bondrenagar slum will be completed soon | बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी

बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी

googlenewsNext
ठळक मुद्देबोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गीप्रकल्प अहवाल देण्याचे महापालिकेला आदेश :सतेज पाटील

कोल्हापूर : बोंद्रेनगर झोपडपट्टीतील घरकुल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. मुंबईतील मंत्रालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृहनिर्माण विभागासोबत बैठक घेतली. संबंधितांना सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.

बोंद्रेनगर झोपडपट्टी या शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यास कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. सर्वांसाठी घरे २०२२' या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या अंतर्गत येथील झोपडपट्टीतील घरे प्रस्तावित करण्यात आली आहे.

यापैकी पहिल्या टप्प्यात ७७ पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण विभाग व महानगरपालिका यांनी लवकर कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेने तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही.आर. श्रीनिवास, कोल्हापूर महानगरपालिकेचे युवराज जबडे, शेल्टर असोसिएटस्, माजी नगरसेवक राहुल माने, दिलीप कांबळे उपस्थित होते.

Web Title: Gharkul project in Bondrenagar slum will be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.