शहरात बंदोबस्तातील पोलिसांना घाटगे ग्रुपतर्फे भोजन वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:13+5:302021-04-29T04:19:13+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात शहरात संचारबंदीत कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलिसांना घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे मोफत भोजनाची पाकिटे वाटप केली. ...
कोल्हापूर : कोरोना काळात शहरात संचारबंदीत कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलिसांना घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे मोफत भोजनाची पाकिटे वाटप केली. दसरा चौकात घाटगे ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योगपती तेज घाटगे यांच्या हस्ते पोलिसांना जेवण वाटप करून उपक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे तेज घाटगे यांच्या पुढाकाराने गरजूंना धान्य वाटप केले. कोविड सेंटर उभा केले तसेच प्रशासनाला शववाहिका उपलब्ध करून दिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसरात्र शहरात बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांना घाटगे ग्रुपच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन भोजनाची पाकिटे वाटप केली. यावेळी सोहम गोडगिरे, विनोद भोसले, राहुल भोसले, विजय चितारे, विनायक सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सागर येवलुजे, रशीद सनदी, आदी उपस्थित होते.
फोटो नं. २८०४२०२१-कोल-पोलीस०१
ओळ : संचारबंदीत कोल्हापूर शहरात बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे उद्योजक तेज घाटगे यांच्या हस्ते भोजनाची पाकिटे व पाणी बाटल्यांचे वाटप केले. यावेळी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आदी उपस्थित होते.
===Photopath===
280421\28kol_3_28042021_5.jpg
===Caption===
संचारबंदीत कोल्हापूर शहरात बंदोबस्तातील पोलिस कर्मचार्यांना घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे उद्योजक तेज घाटगे यांच्या हस्ते भोजनाची पाकिटे व पाणी बाटली वाटप केले. यावेळी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.