वारणा दूध संघामार्फत महाशिवरात्रीनिमित्त सभासदांना तूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:41+5:302021-03-07T04:21:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत महाशिवरात्री - २०२१ निमित्त सभासदांना प्रतिवर्षाप्रमाणे तूप देण्यात येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत महाशिवरात्री - २०२१ निमित्त सभासदांना प्रतिवर्षाप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. दि. १० ते २५ मार्च या कालावधित संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत सभासदांना तूप वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील दूध संस्थांकडे सभासदांना दि.१० ते २५ मार्च या कालावधीमध्ये तुपाचे वाटप होईल. कोल्हापूर परिसरातील अ वर्ग व क वर्ग सभासदांचे तुपाचे वाटप १० मार्चपासून स्टेशन रोडवरील विक्री केंद्रातून सुरू होणार आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून सभासदांच्या सोयीच्यादृष्टीने सभासद यादी क्रमांकानुसार तुपाचे वाटप होणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. सभासदांनी आपले ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप सभासदांनी घेऊन जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक श्री. येडूरकर यांनी केले.
यावेळी संघाचे अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंगचे एस. एल. मगदूम, अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, अर्चना करोशी, सचिन माने आदी उपस्थित होते.
.............
चौकटीत -
कोल्हापूर- अ व क वर्ग यादी क्र.१ ते ५०० ( दि. १० व ११ मार्च )
अ वर्ग यादी क्र- ५०१ ते ११२४ ( दि. १२ व १३ मार्च )
कोल्हापूर - क वर्ग यादी क्र १ ते ५०० ( दि. १४ व १५ ),
क वर्ग यादी क्र- ५०१ ते १००० ( दि. १६ ते १७ )
क वर्ग यादी क्र- १००१ ते १५०० ( दि. १८ ते १९ )
क वर्ग यादी क्र. १५०१ ते २००० ( दि. २० व २१ )