घोडावत कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:02+5:302021-05-25T04:28:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव : अतिग्रे येथील घोडावत कोविड सेंटरसाठी लागणारे औषधे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून ...

Ghodavat Kovid Center a boon for patients | घोडावत कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

घोडावत कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव : अतिग्रे येथील घोडावत कोविड सेंटरसाठी लागणारे औषधे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून, हे सेंटर रुग्णासाठी वरदान ठरत असल्याचे मत महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्याराणी पाटील यांनी व्यक्त केले. घोडावत कोविड सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी माले व अतिग्रे गावास भेट देऊन घोडावत कोविड सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्याशी सेंटरमधील सोयीसुविधा व समस्यासंबंधी चर्चा केली. अतिग्रे येथील घोडावत कोविड सेंटरमध्ये ३८० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये बिगर ऑक्सिजन बेड ३३० रुग्ण व २०ऑक्सिजन सुविधा रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये बारा शल्यविशारद, सोळा परिचारिका, चार देखभाल कर्मचारी व आठ परिचारक सेवा देत आहेत.

दरम्यान, या सेंटरकरिता सात शल्यविशारद, वीस देखभाल कर्मचारी, वीस परिचारक यांची आवश्यकता असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारांसाठी अधिकाधिक औषध पुरवठा होणे व ऑक्सिजन मात्रा वाढविणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उत्तम मदने यांनी सभापती डॉ. पद्याराणी पाटील यांच्यासमोर व्यक्त केले.

Web Title: Ghodavat Kovid Center a boon for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.