जरळीत ५० फूट विहिरीत पडलेल्या घोणसला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:12+5:302021-06-11T04:17:12+5:30
नूल-भडगाव मार्गावरील जरळी बस थांब्यानजीकच्या या विहिरीचे पाणी त्या परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका नको म्हणून ...
नूल-भडगाव मार्गावरील जरळी बस थांब्यानजीकच्या या विहिरीचे पाणी त्या परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका नको म्हणून गावातील सर्पमित्र आप्पा आणि काही तरुणांनी त्या सापाला पाण्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला. त्यासाठी भरपूर प्रयत्नही केले. परंतु, झाडाझुडपांनी वेढलेल्या त्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे विहिरीच्या तीन्ही बाजूंनी दोर बांधण्यात आले. त्या दोरीच्या साहाय्याने सर्पमित्र आप्पा विहिरीत उतरला. दगडांच्या फटीत बसलेल्या ‘त्या’ सापाला त्यांने जिवंत पकडले. ‘त्या’ सापासह आप्पालाही दोरीच्या साहाय्याने विहिरीतून वर काढण्यात आले. त्यानंतर त्या सापाला आजरानजीकच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
फोटो ओळी-
जरळी (ता. गडहिंग्लज) येथे सर्पमित्र आप्पासाहेब दुंडगे यांनी विहिरीतून बाहेर काढलेला घोणस. सोबत त्याला सहकार्य करणारे तरुण.