घुणकीच्या युवकाचा वारणेत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:49+5:302021-05-20T04:26:49+5:30

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती : विजय शिंदे शिरोली एमआयडीसीमध्ये नोकरीस होता. लॉकडाऊनपासून घरी होता. भावासोबत जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती ...

Ghunaki youth drowned in Warne | घुणकीच्या युवकाचा वारणेत बुडून मृत्यू

घुणकीच्या युवकाचा वारणेत बुडून मृत्यू

Next

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती : विजय शिंदे शिरोली एमआयडीसीमध्ये नोकरीस होता. लॉकडाऊनपासून घरी होता. भावासोबत जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती करत होता. मंगळवारी (दि. १८) दुपारी गोठ्यातील काम संपवून मित्रांसोबत वारणा नदीच्या चावरे-कुंडलवाडी धरण बंधाऱ्यावर पोहायला गेला होता. नदीला पाणी भरपूर असल्याने बंधाऱ्यातून मोठा प्रवाह सुरू आहे. या ठिकाणी सर्वजण पोहत होते. विजयने बंधाऱ्यावरून उडी मारल्यानंतर तो प्रवाहातून वर आला नसल्याचे मित्रांनी सांगितले. पोलिसांसह नातेवाईकांनी तपास केला.

बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, सिद्धार्थ पाटील, सतीश पाटील, पृथ्वीराज पाटील, रोहित जाधव यांच्या पथकाने वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, फौजदार खान, काँस्टेबल नरसिंह कुंभार, रेणुसे, पोलीस पाटील संदीप तेली, तलाठी प्रशांत काळे यांच्या सहकार्यातून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वारणा नदीत तपास केला. तथापि मृतदेह मिळाला नाही.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बंधाऱ्याजवळ मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती कांबळे यानी उत्तरीय तपासणी केली.पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब दुकाने व जावेद रोटीवाले अधिक तपास करीत आहेत. विजयच्या मृत्यूने घुणकीत हळहळ व्यक्त झाली.त्याच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे.

फोटो ओळी :

१) विजय शिंदे

Web Title: Ghunaki youth drowned in Warne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.