राजश्री साकळे यांना जायंट्स क्लबचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:27+5:302021-03-24T04:21:27+5:30
पुरस्कार वितरण सोहळा जायंट्स सभागृहात झाला. त्याचे संयोजन डॉ. आशा शितोळे आणि स्नेहल जाधव यांनी केले. प्रास्ताविक सुरेश खांडेकर ...
पुरस्कार वितरण सोहळा जायंट्स सभागृहात झाला. त्याचे संयोजन डॉ. आशा शितोळे आणि स्नेहल जाधव यांनी केले. प्रास्ताविक सुरेश खांडेकर यांनी केले. शोभा रेडेकर यांनी आभार मानले. साकळे या गेली पस्तीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षण आणि लैंगिक शोषण हा त्यांचा अभ्यास विषय आहे. त्यांनी ‘शारीरबोध’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून या संस्थेमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर किशोरवयीन मुला-मुलींना त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्या राज्य शासनाच्या लैंगिक शिक्षण या विषयातल्या राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. शासनाच्या लैंगिक शिक्षण समितीतही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.' कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३ ' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे.
फोटो : २३०३२०२१-कोल-साकळे पुरस्कार