गिरगाव कोविड सेंटर बाधितांना वरदान ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:20+5:302021-05-16T04:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिंडनेर्ली : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून संभाजी ब्रिगेडने सुरू केलेले कोविड सेंटर ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना वरदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडनेर्ली :
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून संभाजी ब्रिगेडने सुरू केलेले कोविड सेंटर ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना वरदान ठरेल असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. गिरगाव (ता. करवीर) येथील संभाजी ब्रिगेड कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महादेव कांबळे उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ यांचे कार्य कौतुकास्पद असून सर्वांनीच स्वतःची खबरदारी घेत प्रशासनाचे नियम पाळून कार्य करावे. ग्रामीण भागातील लोकांसाठी हे कोळी सेंटर वरदान ठरेल त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून माझेही पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले.
सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेले गिरगाव हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. अगदी कमी दिवसांमध्ये गावातील कोरोना पेशंटची संख्या वाढली असून वृध्द लोकांबरोबर तरुणही कोरोनाला बळी पडले आहेत. त्यामुळे प्राथमिक लक्षणे असणारी पेशंटना धीर देणे गरजेचे आहे त्यांचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य संतुलन साधण्यासाठी आपण संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ,आजी -माजी सैनिक, ग्रामस्थ, तरुण मंडळे, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गिरगाव-पाचगाव रोडवरील राजर्षी शाहू आश्रमशाळेमध्ये शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी जि.प.सदस्या सौ. संध्याराणी विलास बेडगे, मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूरचे गणी आजरेकर, द. वडगावचे सरपंच अनिल मुळीक, गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून आपणही यासाठी सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. याप्रसंगी गावातील हिंदुराव साळोखे या ९४ वर्षाच्या आजोबांनी रूपेश पाटील यांच्याकडे दोन हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
अश्विन वागळे, ज्ञानेश्वर साळोखे, चेतन आरमाळ,उमेश लोहार, संजय काटकर,अभिजीत भोसले,भगवान कोईगडे, निलेश सुतार, अक्षय पाटील, मधुर कांबळे, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते.
आभार प्रमोद पाटील यांनी मानले.
चौकट : गिरगावाला पडलेल्या कोरोनाच्या विळख्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत वयोवृद्ध लोकांपासून आता गावातील तरुणही कोरोनाला बळी पडत असल्याची माहिती देताना रूपेश पाटील यांना अश्रू अनावर झाले त्यामुळे सर्व वातावरण गंभीर बनले.
फोटोओळी : संभाजी ब्रिगेड कोविड सेंटरला दोन हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देताना ज्येष्ठ नागरिक हिंदुराव साळोखे, खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, सरपंच महादेव कांबळे.