रत्नागिरी जिल्ह्यातील बालिकेचा भाजून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 06:38 PM2021-01-06T18:38:50+5:302021-01-06T18:40:20+5:30
Cpr Hospital kolhapur Ratnagiri -अंघोळीसाठी उकळलेले बादलीतील पाणी अंगावर सांडल्याने पाच वर्षाच्या बालिकेचा बुधवारी मृत्यू झाला. सानवी नीतेश बल्लाळ (वय ५, रा. चिखली, बौध्दवाडी, ता. संगमनेर, जि. रत्नागिरी) असे मृत बालिकेचे नाव आहे. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे घडली.
कोल्हापूर : अंघोळीसाठी उकळलेले बादलीतील पाणी अंगावर सांडल्याने पाच वर्षाच्या बालिकेचा बुधवारी मृत्यू झाला. सानवी नीतेश बल्लाळ (वय ५, रा. चिखली, बौध्दवाडी, ता. संगमनेर, जि. रत्नागिरी) असे मृत बालिकेचे नाव आहे. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे घडली.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्यासुमारास सानवी बल्लाळ ही बालिका घरात खेळत होती. त्यावेळी अंघोळीसाठी उकळलेले पाणी बादलीत ठेवले होते. खेळताना तिचा बदलीला हात लागल्याने त्यातील पाणी तिच्या अंगावर सांडले. या दुर्घटनेत ती बालिका भाजून गंभीर जखमी झाली.
तातडीने तिच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला अत्यवस्थेत कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्थलांतरित केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.