उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:32 PM2017-12-15T13:32:21+5:302017-12-15T13:46:45+5:30

५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले. कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

The girl from Chandgad, who was admitted to Kolhapur hospital after being removed from the hospital, is now treated in Mumbai! | उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार !

५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयामधून हलविले चंद्रकांतदादा पाटील वैद्यकिय खर्च करणारसीपीआरचे अधिष्ठाता रामानंद यांची माहिती

कोल्हापूर : ५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.

कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचा सर्व वैद्यकिय खर्च महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्यामुळे या मुलीवरील सर्व वैद्यकिय चाचण्या आता मुंबईत होणार आहेत.

सीपीआर रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. ११) सायंकाळी उपचारासाठी या मुलीला आणण्यात आले. याठिकाणी तिचे सी.टी.स्कॅन, एमआरआय आणि सर्व शारिरीक तपासण्या करण्यात आल्या. पण, काही निदान झाले नाही. त्यामुळे न्युरो फिजिथेरपीस्ट डॉ. औरंगाबादकर यांनीही तपासणी केली. पण, कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दूपारी तिला रुग्णवाहिकेमधून मुंबईला नेण्यात आले. विजया चौगुले यांच्यासमवेत तिची आजी पार्वती चौगुले, वडिल निवृत्ती चौगुले व नातेवाईक गेले आहेत.



यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, भाजपा युवा मोर्चाचे शिवाजी पेठ मंडलचे अध्यक्ष ऋतुराज इंगळे आदी उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव )

भोतोलीतील या मुलीला गृहपाठाच्या वही घरी विसरली म्हणून संशयित शिक्षिका अश्विनी देवण यांनी ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा २४ नोव्हेंबरला कानूर येथे शाळेत दिली. विजयाने कशातरी ३०० उठाबशा काढल्या. पण, त्यानंतर तिची प्रकृति बिघडली. प्रथम तिच्यावर गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सीपीआर रुग्णालयाकडे उपचारासाठी आणण्यात आले होते.

विजया चौगुले या मुलीचे निदान स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्यावर ‘व्हीडीओ-ईईजी’नुसार अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकिय चाचण्या केईएम रुग्णालयामध्ये होणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बोलणे झाले आहे.
-डॉ. जयप्रकाश रामानंद,
प्रभारी अधिष्ठाता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.

Web Title: The girl from Chandgad, who was admitted to Kolhapur hospital after being removed from the hospital, is now treated in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.