खरंच मुलगी जड होतेय का...? : क्रौर्य धक्कादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:41 AM2018-12-21T00:41:48+5:302018-12-21T00:42:19+5:30
आंबा : गाव पातळीवरील शाळा, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तसेच मीडिया या माध्यमातून मुलीचे स्वागत, मुलगी शिकवा, स्त्रीसन्मान यातून ...
आंबा : गाव पातळीवरील शाळा, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तसेच मीडिया या माध्यमातून मुलीचे स्वागत, मुलगी शिकवा, स्त्रीसन्मान यातून मुलगीचा सन्मान आणि स्त्री-पुरुष समानता साधली जात आहे. मात्र, शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी, भेडसगाव येथील घटना मुलीला वाचवा या मोहिमेला तिलांजली देणाºया ठरल्या आहेत.
कायद्यानेही महिलांच्या सुरक्षिततेला व जीवनविषयक हक्काला निश्चितपणा प्राप्त करून दिला आहे.
प्रगतीचा टप्पा आणि बदलत्या काळानुसार पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही मानसन्मान व विकासाची संधी दिली जात आहे. असे कोणते क्षेत्र राहिले नाही की त्यामध्ये मुली किंवा महिला मागे आहेत. अशा परिस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील पाडवे कुटुंबातील जन्मदात्यांनीच आपल्या दोन वर्षांच्या मुलीस थिमेट हे कीटकनाशक पाजून तिचे जीवन संपवले. त्या घटनेची राळ खाली बसते न बसते तोच भेडसगावसारख्या जागृत गावातील तलावात अर्भकाला जलसमाधी देणारे कौर्य घडते. हे सारेच मुलीला वाचवा या मोहिमेला तिलांजली देणारे ठरले आहे.
वंशाला दिवा पाहिजे या पारंपरिक विचारातून मुलगीऐवजी मुलगा हवा अशी कौटुंबिक मानसिकता टिकून आहे आणि त्यातून मुलगीऐवजी मुलगा असा भेदभाव जपणारी मंडळी कमी नाहीत. एकीकडे मुली कोणत्या क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मागे नाहीत हे बदलते आशावादी चित्र असताना मुलग्याचा आग्रह का हा प्रश्न सतावतो. पाडवीसारखी कुटुंबे आणि त्यांची मानसिकता हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल अशी मानसिकता बाळगलेली अनेक मंडळी नजरेआड आहेत.
स्त्री-पुरुष समानता या तत्त्वाला मूरड घालणारी अशी अनेक मंडळी कोणत्या युगात जगतात हा प्रश्नच आहे. एकीकडे मुलांची संख्या वाढत आहे, तर मुलींचा जन्मदर घटत आहे. त्यातून समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून नवे प्रश्न पुढे येत आहेत. निकोप समाज निर्मितीसाठी मानवतेला तिलांजली देणाºया अशा घटनेचा सार्वजनिक निषेध होताना याबाबतची जागृती, समुपदेशन व्यापकपणे होण्याची
गरज आहे.
अंजलीसाठी मदतीचे हात
पाडवे कुटुंबातील पोरकी ठरलेल्या अंजलीस विविध संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. समाजभान जपणारी अशी मंडळी एकीकडे, तर पोटच्या गोळ्याला मारणारी वृत्ती एकीकडे, असे विरोधाभास चित्र आहे.
एकीकडे मुली कोणत्या क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मागे नाहीत हे बदलते आशावादी चित्र असताना मुलग्याचा आग्रह का हा प्रश्न सतावतो.