मुलीच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यात..!
By admin | Published: June 26, 2017 12:25 AM2017-06-26T00:25:27+5:302017-06-26T00:25:27+5:30
मुलीच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यात..!
राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : पहिल्या मुलीच्या पाठीवर जन्माला आलेल्या ‘लेकी’चे स्वागतही धुमधडाक्यात करून येथील एका युवा कार्यकर्त्याने समाजासमोर नवा वस्तुपाठ ठेवला आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावातील या पुरोगामी तरुणाचे नाव आहे गणपतराव पाटोळे. सध्या ते येथील साधना प्रशालेत लेखनिक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची पत्नी ‘साधना’ही त्याच शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यांना ‘स्मित’ नावाची पहिली मुलगी आहे. तिच्या पाठीवर महिन्यापूर्वी जन्मलेल्या मुलीच्या बारशात त्या दोघांनी सामाजिक भानही जपले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, बाजीराव पाटोळे, रामू शिप्पुरे, ऊर्मिलादेवी शिंदे, उज्वला दळवी, आक्काताई पाटोळे, सुशिला पाटोळे, पांडुरंग करंबळकर, साताप्पा कांबळे, प्रकाश भोईटे, अनिल मगर, शिवाजी होडगे, तानाजी कुरळे, भैरू अडसुळे, महादेव अडसुळे, इनास कुटीन्हो, संजय नाईक, शिवाजी कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बार्देस्कर यांनी आभार मानले.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह एकत्र कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या शांताबाई महादेव पाटील व महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत असणाऱ्या नंदूरबारच्या नाझनीन पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
लेकीचे नाव त्यांनी ‘हृदया’ ठेवले. नामकरण सोहळ्यानिमित्त वनक्षेत्रपाल प्रदीप शिंदे यांच्या हस्ते आपल्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यानंतर बारशाला आलेल्या सुमारे ६५० लोकांना विविध प्रकारची वृक्षरोपे भेट दिली.