शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचा तिसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:37 PM2019-11-27T17:37:48+5:302019-11-27T17:39:09+5:30

कोल्हापूर : गोंदिया येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ...

 Girls' High School ranked third in school-level rugby competition | शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचा तिसरा क्रमांक

गोंदिया येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाला बक्षीस प्रदान करताना मान्यवर.

Next
ठळक मुद्देचार खेळाडूंची महाराष्ट्र स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : गोंदिया येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

संघातील चार खेळाडूंची महाराष्ट्र स्पर्धेसाठी निवड झाली. संघामध्ये वैष्णवी पाटील, सानिका पाटील, स्वाती माळी, स्नेहा कांबळे, स्नेहल पाटील, प्राची पारखे, नेहा पाटील, सृष्टी कळंत्रे, शुभांगी चौगुले, पायल कांबळे, आर्या कानकेकर, श्रुतिका खोंद्रे यांचा समावेश होता.
विजेत्या संघाला संस्थेचे चेअरमन आर. डी. पाटील (वडगावकर), मुख्याध्यापिका व्ही. के. पाटील, एस. बी. शिंदे यांचे प्रोत्साहन, तर क्रीडाशिक्षिका उज्ज्वला देसाई, दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title:  Girls' High School ranked third in school-level rugby competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.