मुलींनो भयमुक्त जीवन जगणे शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:02+5:302021-04-07T04:25:02+5:30
धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भेटीदरम्यान आयोजित केलेल्या विशेष भेटीदरम्यान त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या ...
धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भेटीदरम्यान आयोजित केलेल्या विशेष भेटीदरम्यान त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य के.एल. बोरनाक हे होते.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, हे ग्रामीण भागातील हायस्कूल व कॉलेज असून, याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी अत्यंत गरीब व कष्टाळू शेतकऱ्यांच्या मुली येतात. त्यांना पाच ते सहा किलोमीटरचा पायी प्रवास करून जंगल हद्दीतून यावे लागते. अशा परिस्थितीतही या मुलींना त्यांचे आई, वडील शिक्षण देत आहेत, ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. या परिस्थितीत शिक्षण घेत असताना जर तुम्हाला कोणी जाणूनबुजून त्रास देत असेल, तर निश्चितपणे निडर बनवून आमच्याकडे तक्रार द्या. संबंधिताला सुतासारखे सरळ करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य एस.एल. उगारे, कॉलेज विभागप्रमुख प्राध्यापक ए.एस. भागाजे, प्रा. डी.के. पाटील, ए.ए. गोसावी, क्रीडा शिक्षक विशाल पाटील, एम.जी. मोगणे, आर.जी. पाटील, आर.जी. पेंढारी आदींसह शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस.एम. ऱ्हायकर यांनी केले.