Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ५० कोटी द्या, इंडिया आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:15 PM2024-08-10T12:15:31+5:302024-08-10T12:16:36+5:30

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने नागरी सुविधा योजनेमधून ५० कोटींचा निधी द्यावा, अशी ...

Give 50 crores for Keshavrao Bhosle Theatre, India Aghadi demands to Chief Minister Eknath Shinde | Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ५० कोटी द्या, इंडिया आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ५० कोटी द्या, इंडिया आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने नागरी सुविधा योजनेमधून ५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.

खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, करवीर नगरीचे भूषण असलेल्या कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला व ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या काही भागाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. यामध्ये नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोल्हापूरकर आणि कलाकारांसाठी हा हृदयात जपून ठेवलेला ठेवा होता. त्यामुळे अशा प्रकारची वास्तू पुन्हा उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या नागरी सुविधा योजनेमधून ५० कोटींचा निधी मंजूर करून सहकार्य करावे.

Web Title: Give 50 crores for Keshavrao Bhosle Theatre, India Aghadi demands to Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.