भात उत्पादकांना ५०० रुपये बोनस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:30 AM2017-10-02T00:30:04+5:302017-10-02T00:30:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनही घटले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सरकारने ५०० रुपये प्रतिक्व्ािंटल बोनस जाहीर करावा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित तिसºया भात परिषदेमध्ये ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, व्यापाºयांच्या खरेदी केंद्रातून शेतकºयांची लुबाडणूक होत असून एम. एस. पी.पेक्षा कमी दराने भात खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्यात यावी. शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी दराने तांदूळ व शेतकºयाचा जादा दराने भात खरेदी करता येईल. ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने आवश्यक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेती उद्योग तोट्यात आला असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याला आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत. भातपिकांसह सर्व पिकांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा व शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, अन्यथा राज्य पातळीवरून देशपातळीपर्यंत आंदोलन करून सरकारकडून दर हिसकावून घेऊ, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
यावेळी रविकांत तुपकर, प्रा. जालंदर पाटील, राजू गड्यान्नावर, भगवान काटे, सयाजी मोरे, विक्रम पाटील, आदी पदाधिकाºयांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावकर मादनाईक, महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, आदी उपस्थित होते.