चिंचवाडला शुद्ध पाणी द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:21+5:302020-12-25T04:20:21+5:30
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणी फिल्टर करणारे यंत्रच बंद अवस्थेत होते. दुरुस्ती करूनही शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत असून, योग्य प्रमाणात तुरटी व टीसीएलचे प्रमाण ठेवण्यात येऊन गावाला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आप्पासो कदम यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चिंचवाड गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून फिल्टर सेवा बंद होती. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. काही दिवसांपूर्वी फिल्टरचे काम केले आहे. तरीही गावाला शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी तुरटी व टीसीएल पावडरचे प्रमाण योग्य प्रमाणात न ठेवल्यामुळे पाणी शुद्धिकरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.