मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:11+5:302021-05-14T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत शासनाने घटनात्मक आरक्षण द्यावे. मराठा युवकांमध्ये असलेला असंतोष ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी :
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत शासनाने घटनात्मक आरक्षण द्यावे. मराठा युवकांमध्ये असलेला असंतोष दूर करावा अशा मागणीचे निवेदन भुदरगड सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ भुदरगड तालुक्याचे वतीने तहसीलदार अश्विनी अडसूळ व पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना देण्यात आले.
निवेदनातील आशय असा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा ज्येष्ठ विधिज्ञ मार्फत करून संसदेत हा ठराव मंजूर करून घेण्यास भाग पाडावे, राष्ट्रपतींच्या सहीने मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण द्यावे, सारथी संस्थेस दोन हजार कोटींची निधी द्यावा, २०१४ मध्ये मराठा आरक्षणातून ज्यांची निवड झाली, त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे. आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना पंचायत समिती उपसभापती सुनील निंबाळकर,माजी जि. प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर , प्रविणसिंह सावंत, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, आनंद चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, अविनाश शिंदे, माजी सरपंच सचिनबाबा देसाई,सचिन भांदिगरे ,संग्रामसिंह पोफळे, पी एस पाटील,,संदीप पाटील,(खानापूर) शरद मोरे ,टी बी पाटील , सुहास चौगुले आदी उपस्थित होते.
१३ गारगोटी मराठा समाज
फ़ोटो ओळ--
गारगोटी येथे मराठा समाजाचे वतीने निवेदन देताना सुनील निंबाळकर, माजी जि. प.सदस्य प्रा अर्जुन आबिटकर, प्रविणसिंह सावंत, प्रा आनंद चव्हाण, सूर्यकांत चव्हाण ,सचिन देसाई,,नंदकुमार शिंदे, सचिन भांदिगरे, आदी