डबल ड्यूटी द्या; मात्र मुंबई नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:08+5:302021-04-01T04:26:08+5:30
कोल्हापूर : मागील वर्षी कोराेना काळात मुंबईतील बससेवेसह बेस्टचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाल्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांतील एस.टी. महामंडळाच्या ...
कोल्हापूर : मागील वर्षी कोराेना काळात मुंबईतील बससेवेसह बेस्टचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाल्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांतील एस.टी. महामंडळाच्या चालक- वाहकांना कर्तव्यासाठी मुंबईला पाठविले होते. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांमध्ये त्यांची कमतरता जाणवत असून, प्रत्येकाला एकाच वेळी दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. येथे कितीही काम करावे लागले तरी चालेल. मात्र, मुंबईला सेवा बजाविण्यास चालक- वाहकांनी नकार दर्शविला आहे.
कोल्हापूर आगारातून मागील वर्षी कोरोनाच्या काळात मुंबईतील बेस्ट सेवेसह महामंडळातील चालक- वाहक मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाले. त्यामुळे ही सेवा प्रभावित झाली. ती पुन्हा सुरळीत सुरू राहण्यासाठी राज्याच्या इतर जिल्ह्यांतील वाहक- चालकांना तेथे सेवा देण्यासाठी पाचारण करण्यात आले. मागील वर्षी कोल्हापूर आगारातून १०० बस व ४०० कर्मचारी मुंबईतील विविध बसस्थानकांमध्ये कार्यरत होते. त्यापैकी यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. आजही येथे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, एस.टी.च्या स्थानिक कामगार संघटनांनी त्यास विरोध दर्शविला आहे. येथील कर्मचारी वर्ग तिकडे वर्ग केल्यानंतर अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर वाढला. त्यामुळे अनेक वाहक- चालकांना डबल ड्यूटी; अर्थात दोन शिफ्टमध्ये काम करावे लागले आहे. हा अनुभव पाठीशी असताना पुन्हा मुंबईला सेवा बजाविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाचा अट्टहास का सुरू आहे. असा सवाल कामगार संघटनांकडून केला जात आहे. तेथून परत आल्यानंतर अनेकांना कोरोनाबाधित व्हावे लागले होते.
जिल्ह्यातून ४०० कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले होते.
चालक - २५
वाहक - २५
परत आल्यानंतर ४५ जण कोरोनाबाधित
परतल्यानंतर अनेकांना बाधा
मागील वर्षी मुंबईला गेलेल्या वाहकांपैकी ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली. या काळात महामंडळाने विशेष रजा या कर्मचाऱ्यांना मंजूर केली नाही. याशिवाय जे कर्मचारी कोल्हापुरातच कर्तव्यावर होते त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पश्चात कुटुंबाला ५० लाखाचे विमा कवच असूनही मिळाले नाही. यात अनेक अटी, शर्ती पूर्ण न केल्याचे कारण विमा कंपन्यांनी दाखविले. त्यामुळे चालक-वाहकांचा मुंबईला पुन्हा सेवेस पाठविण्यास तीव्र विरोध आहे.
प्रतिक्रिया
कारवाईची भीती दाखवून पुन्हा मुंबईला सेवा बजाविण्यासाठी महामंडळाचे प्रशासन सज्ज झाले आहे. मुळातच कोल्हापूर विभागात कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटी करावी लागते. त्यामुळे गरज नसताना येथून चालक- वाहकांना पाठवू नये.
-श्रीमंत गायकवाड, वाहक, कागल
प्रतिक्रिया
मुळातच कोल्हापूर विभागात चालक- वाहक कमी आहेत. येथील काढून मुंबईत पाठवून तेथील कर्मचाऱ्यांचेही काम हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे प्रशासन तेथे पाठविण्याचा अट्टहास का करत आहे. जोखमीच्या ठिकाणी पाठवून महामंडळ आमच्या कुटुंबाचा विचार करणार आहे की नाही?
-शरद तवटे, वाहक
कोट
कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस अद्यापही दिलेली नाही. त्याचा विचार महामंडळाच्या प्रशासनाने प्राधान्याने करणे गरजेचे आहे. यापूर्वी पाठविलेले प्रत्येकी २५ चालक- वाहक परत बोलवावेत. त्यांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. पुन्हा पाठविण्याचा विचार करू नये.
-उत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना
-