गडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:03+5:302021-06-24T04:17:03+5:30

गडहिंग्लज : अन्नसुरक्षा कायद्यान्वये मिळणा-या धान्यापासून वंचित असणा-या शहरातील शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात ...

Give the grain on the ration card to the deprived in the town of Gadhinglaj | गडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्या

गडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्या

Next

गडहिंग्लज : अन्नसुरक्षा कायद्यान्वये मिळणा-या धान्यापासून वंचित असणा-या शहरातील शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह बेघर वसाहतीमधील सुमारे ६०० शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा धान्यापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मोलमजुरी, धुणीभांडी, विधवा, परित्यक्तांचा समावेश आहे. त्यांना रेशनवरील धान्य देण्यात यावे.

शिष्टमंडळात उदय जोशी, हारुन सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, महेश सलवादे, सुनीता नाईक, शबाना मकानदार, रेश्मा कांबळे, शुभदा पाटील, सावित्री पाटील, शर्मिली पोतदार, रूपाली परिट, दीपक कुराडे, मंजूषा कदम, शारदा आजरी आदींचा समावेश होता.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे निवासी तहसीलदार अशोक पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी उदय जोशी, हारुन सय्यद, रेश्मा कांबळे, शर्मिला पोतदार, रमजान अत्तार, शारदा आजरी आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २३०६२०२१-गड-०३

Web Title: Give the grain on the ration card to the deprived in the town of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.