काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Published: July 24, 2023 07:40 PM2023-07-24T19:40:41+5:302023-07-24T19:51:00+5:30

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ...

Give immediate funds for the repair of Kalammavadi Dam, MLA P. N. Patil demand | काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

googlenewsNext

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. भिंतीला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील-सडोलीकर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

काळम्मावाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता २८ टी.एम.सी. असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ६५० लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून ८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे व निविदा  काढणार आहे. असे सांगून काही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र पावसाला उशिर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र  पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाणी टंचाई का निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच  मंजूर झाले नसून ८४  कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे. त्यामुळे यंदा पुन्हा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे धरण फुटल्यावरच काम होणार काय? असा संतप्त सवाल आ. पाटील यांनी उपस्थित केला. 

उपमुख्यमंत्री फडणवीस तातडीने कार्यवाहीचे दिले आश्वासन

धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार काय? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणीही पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

Web Title: Give immediate funds for the repair of Kalammavadi Dam, MLA P. N. Patil demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.