कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:39+5:302021-05-14T04:22:39+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात ...

Give information about children orphaned by corona on 1098 | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, एकाच कुटुंबातील पती, पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या वाट्याला अनाथपण येत आहे. या अनाथ झालेल्या मुलांना परस्पर दत्तक देण्यासारखे मेसेजेस व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांची तस्करी, अवैध कारणांसाठी वापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुजाता शिंदे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, आशिष पुंडपळ, संजय चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी सहभाग घेतला.

यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड सेेंटरमध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या, असे सांगणारे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती देण्याची जबाबदारी रुग्णालयांची, वैद्यकीय अधिकारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची असणार आहे.

---

बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी कोविड सेंटर

येथील बालकल्याण संकुलमध्ये पोलिसांकडील आदेशाने बाहेरून आलेल्या मुलींमुळे अन्य बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ४५ हून अधिक बालके बाधित झाली आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. येथे त्यांची कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना संस्थेत दाखल केले जाईल.

---

पुनर्वसनासाठी योग्य पाऊल

अनाथ झालेल्या बालकांची बेकायदेशीर तस्करी, अनैतिक मानवी वाहतूक, बालकामगार, वेश्या व्यवसाय अशा कारणांसाठी वापर केला जाऊ शकतो. असे घडू नये, त्यांचे बालपण जपले जावे, त्यांना नातेवाईक सांभाळणार असतील, तर त्यांनी तसे सांगावे, त्यासाठी कोणतीही आडकाठी घातली जात नाही; पण ते शक्य नसेल, तर बालकांना शासकीय संस्थेत दाखल करण्यात यावे. असे झाल्यास नियमानुसार दत्तक देऊन पुनर्वसन करता येईल.

--

नोंदणीशिवाय अधिकार नाही

अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था पुढे आल्या आहेत, मात्र जोपर्यंत शासनदरबारी नोंदणी होत नाही, तोपर्यंत त्यांना अशी बालके सांभाळण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नातेवाईकांनी सर्वात आधी १०९८ ला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---

Web Title: Give information about children orphaned by corona on 1098

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.