‘आयआरबी’ला कायद्याच्या आधारे दणका देऊ

By admin | Published: November 18, 2014 12:01 AM2014-11-18T00:01:13+5:302014-11-18T00:07:31+5:30

महापौर : महापालिकेत कृती समितीच्या कार्यकर्त्यांची झाली बैठक

Give 'IRB' a chance on the basis of law | ‘आयआरबी’ला कायद्याच्या आधारे दणका देऊ

‘आयआरबी’ला कायद्याच्या आधारे दणका देऊ

Next

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते प्रकल्पाच्या कराराप्रमाणे अनेक कामे ‘आयआरबी’ने केलेली नाहीत. फुलेवाडी नाक्याच्या पूर्वेकडील रस्ता, कळंबा, आर. के. नगर, उचगाव, सरनोबतवाडी या नाक्यांजवळील रस्तेही करण्याची तसदी घेतलेली नाही. खराब रस्त्याप्रकरणी सर्व नाक्यांबाबत पोलिसांत तक्रार देऊन नाके जप्त करण्याची कारवाई करा, अशी मागणी आज, सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापौर तृप्ती माळवी यांना निवेदनाद्वारे केली. कायद्याच्या आधारे आयआरबीला दणका देऊ. टोल आंदोलनात यापुढेही सक्रिय असेन, असे आश्वासन महापौरांनी कार्यकर्त्यांना दिले.
शहरातील अर्धवट राहिलेल्या खराब रस्त्यांची जबाबदारी घेण्यास आयआरबीने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली. महापालिकेच्या स्थायी सभागृहात कार्यकर्त्यांशी महापौरांनी चर्चा केली. यावेळी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सहा टोलनाके नागरिकांना त्रासाचे ठरत आहेत. या सर्व सहा टोलनाक्यांवररितसर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण पथकाकडून हटविण्यात यावेत. याकामी महापौरांनी हाक दिल्यास सर्व कोल्हापूरकर त्यांच्या मदतीला धावून येतील. नाके काढल्यानंतरही टोलवसुली सुरू केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी कृती समितीने निवेदनाद्वारे केली.

‘आयआरबी’ने कराराचा केलेला भंग व अद्याप करावयाचे रस्ते याबाबत कारवाईसाठी महापालिका कायदेतज्ज्ञांच्या सल्ला घेईल. कायद्याच्या आधारे आयआरबीवर कठोर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन बांधील आहे. टोल आंदोलनात पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहीन.
- महापौर तृप्ती माळवी

Web Title: Give 'IRB' a chance on the basis of law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.