नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्जमाफी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:27+5:302021-04-03T04:20:27+5:30
उचगाव : राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी सरनोबतवाडी ...
उचगाव : राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी सरनोबतवाडी येथील नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभच झाला नाही. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीची योजना त्वरित जाहीर करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. येथील सुभाष विविध कार्यकारी सहकारी (वि) या संस्थेचा इतिहास पाहता बँक व संस्था पातळीवर कधीही थकबाकी नाही. मात्र, या संस्थेच्या शेतकरी सभासदांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत या संस्थेच्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारने याचा विचार करुन प्रामाणिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीची योजना त्वरित जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुभाष विविध कार्यकारी सहकारी (वि)संस्थेचे चेअरमन उत्तम अडसूळ, अमरसिंह सरनोबत, खंडेराव माने, दीपक आडसूळ, विश्वास पाटील, तमन्ना घागरे उपस्थित होते.
फोटो : ०२ सरनोबतवाडी निवेदन
ओळ: नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली.