स्थानिक खेळाडूंना संधी देणार

By Admin | Published: March 4, 2016 09:36 PM2016-03-04T21:36:24+5:302016-03-05T00:07:01+5:30

नीलेश राणे : मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटंचा सत्कार

Give local players the opportunity | स्थानिक खेळाडूंना संधी देणार

स्थानिक खेळाडूंना संधी देणार

googlenewsNext

मालवण : उद्योजक बाबा परब व चिवला बीच मित्रमंडळाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना संधी मिळाली. आपल्यालाही क्रिकेटची आवड असून खासदार असताना अनेक खेळाडूंना संधी दिली. स्थानिकांना संधी देणारे आता आमदार, खासदार आहेत की नाही हेच कळत नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी आपल्यावरच आली आहे. बाबा परब आणि मित्रमंडळाने क्रिकेटपुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन लोकांचा विकास साध्य करावा, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
मालवण येथे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबा परब आणि चिवला बीच मित्रमंडळाच्यावतीने टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर ३ ते ६ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मंदार केणी, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती हिमाली अमरे, खरेदी संघाचे अध्यक्ष आबा हडकर, नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दीपक पाटकर, उदय परब, आनंद शिरवलकर, दामू तोडणकर, राजू बिडये, यतीन खोत, अभय कदम, अमु हर्डीकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कोकणाने अनेक खेळाडू राज्यासह देशाला दिले आहेत. यापुढेही या भूमीतून असेच खेळाडू निर्माण होतील, असे संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितले. तर अशोक तोडणकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, हिमाली अमरे यांनी बाबा परब मित्रमंडळाचे कौतुक करताना मालवणच्या या मातीतून अनेक खेळाडू घडले. यापुढेही दर्जदार खेळाडू घडावेत, अशा शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)

ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सन्मान
बाबा परब मित्रमंडळाच्यावतीने मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटंूचा सन्मान करण्यात आला. यात भाऊ हडकर, लीलाधर हडकर, विनायक मेतर, रमेश गिरकर, विजय तारी, दीपक मयेकर, सतीश गावकर, भाई खराडे, नरी चिंदरकर, दिलीप मांजरेकर, बाळा पडेलकर, जगदीश नेवाळकर, सिराज मुकादम, सत्यविजय चिंदरकर, दिलीप मालवणकर, उत्तम नेमळेकर, बबन रेडकर, उमेश मांजरेकर, आम्रोज आल्मेडा, मंगेश धुरी, नंदू देसाई, पप्पू परब, दीपक धुरी यांचा सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच युवा क्रिकेटपटू राहुल परुळेकर याचाही विशेष गौरव करण्यात आला.

Web Title: Give local players the opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.