मणिकर्णिकेतील साहित्य पुरातत्वच्या ताब्यात द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:22+5:302021-03-13T04:46:22+5:30

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईदरम्यान सापडलेले पुरातन साहित्य व अवशेष पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावे, ...

Give the material in Manikarnika to the possession of the archaeologist | मणिकर्णिकेतील साहित्य पुरातत्वच्या ताब्यात द्या

मणिकर्णिकेतील साहित्य पुरातत्वच्या ताब्यात द्या

Next

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईदरम्यान सापडलेले पुरातन साहित्य व अवशेष पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावे, असे पत्र विभागाने शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पाठविले आहे.

विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी हे पत्र पाठविले आहे. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळचे मणिकर्णिका कुंड मूळ स्वरूपात आणण्याासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार खुदाईची करण्याची परवानगी देण्यात आली होती. या खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात पुरावशेष सापडले आहेत. अनेक पुरातन साहित्य साहित्य सापडले आहेत. भारतीय निखात निधी अधिनियमानुसार हे पुरावशेष पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करावी, या अवशेषांचा संशोधनात्मक अभ्यासासाठी उपयोग होणार आहे तसेच ते टाऊन हॉल म्युझियम या संग्रहालयात जतन करून ठेवता येतील. संग्रहालयाला भेट देणाऱ्या देशी-विदेश पर्यटकांना ते पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक ठेव्याचे योग्यप्रकारे जतन संवर्धन होणार आहे, तरी हे साहित्य पुरातत्वकडे पाठविण्याची त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असे यात नमूद करण्यात आले आहे.

--

Web Title: Give the material in Manikarnika to the possession of the archaeologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.