मला कोविड सेंटरमध्ये विनामोबदला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:28+5:302021-06-05T04:18:28+5:30

मुरगूड : कोविड सेंटरमध्ये चुकूनही कोण जाण्याचा प्रयत्न करत नाही; पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना रुग्णांची अदबीने चौकशी करून ...

Give me a job at the Covid Center for free | मला कोविड सेंटरमध्ये विनामोबदला काम द्या

मला कोविड सेंटरमध्ये विनामोबदला काम द्या

Next

मुरगूड : कोविड सेंटरमध्ये चुकूनही कोण जाण्याचा प्रयत्न करत नाही; पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना रुग्णांची अदबीने चौकशी करून त्यांना धीर देण्याचे काम मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार करत आहेत. आता तर चक्क मुरगूड ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये विनामोबदला काम करण्याचा मनोदय त्यांनी ठेवला आहे. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे त्यांनी रीतसर अर्जाद्वारे मागणी केली आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या मागणीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

जमादार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या अर्जात आपले शिक्षण बी.ए. पूर्ण असून, सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. शासनाने सर्व मंत्री महोदय, जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व अधिकारी, आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर्स व आपण या संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहात. शर्थीने आपले जीव धोक्यात घालून लढत आहात. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

शासनामार्फत मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नवीन कोविड सेंटर सुरू करत आहात. या सेंटरमध्ये मला विनामोबदला काम करण्याची संधी द्यावी. आपण कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिल्या लाटेमध्ये नगरपालिकेच्या कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याबरोबर कोरोना विरोधातील लढ्यामध्ये व सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. तसेच अनेक कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे समवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये सहभागी होतो. सध्या या अडचणीच्या काळामध्ये माणसाने माणसाला मदत केली नाही, तर माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही. आम्हाला काळ माफ करणार नाही. त्यामुळे होणार्‍या सेंटरमध्ये विनामोबदला कोणतेही काम म्हणजे स्वच्छतेचेसुद्धा काम दिले तरी मी आनंदाने करण्यास तयार आहे. मला रुग्णांची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींचे पद हे नुसते शोभेचे पद नसून लोकसेवक म्हणून काम करताना त्यामध्ये तळमळ हवी. जमादार यांच्या या पत्रातील मजकुराने त्यांची तळमळ व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या काळात शहरासह परिसरातील रुग्णांसाठी झटणाऱ्यांना आधार देणाऱ्या आणि आता तर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची परवानगी मागणाऱ्या नगराध्यक्ष जमादार यांचा हा अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Give me a job at the Covid Center for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.