हॅट्ट्रिकची संधी द्या : सतेज पाटील

By admin | Published: September 25, 2014 01:08 AM2014-09-25T01:08:02+5:302014-09-25T01:14:58+5:30

कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला.

Give the opportunity of hatrick: Satej Patil | हॅट्ट्रिकची संधी द्या : सतेज पाटील

हॅट्ट्रिकची संधी द्या : सतेज पाटील

Next

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत एक वर्षाच्या संपर्काच्या जोरावर ‘दक्षिण’ मतदारसंघातून निवडणूक लढविली. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखविला. सर्वसामान्य जनता त्या निवडणुकीत माझ्यासोबत राहिली. या निवडणुकीतही सर्वसामान्य जनतेने मला पाठबळ देऊन विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी द्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. कावणे (ता. करवीर) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत पाटील होते.
पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीतही मुख्य प्रचार प्रारंभ करण्यापूर्वी कावणे येथेच पहिला जाहीर मेळावा घेतला होता आणि या निवडणुकीत जनतेने मला विजयी केले. त्यानंतर जनतेच्या आशीर्वादावर राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काम करण्याची संधी दिली आणि ‘दक्षिण’मध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले. या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी एकदिलाने व मतभेद विसरून ताकदीने प्रयत्न करावेत. मतदारसंघांत केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. गट-तट बाजूला ठेवून प्रत्येकाचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे जेव्हा आता मी तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहे, तेव्हा रूसवे-फुगवे न करता सर्वांनी माझ्यासाठी काम करावे येणाऱ्या वीस दिवसांत जास्तीत-जास्त मताधिक्य मिळविण्याची जबाबदारी तुमची आहे.
कावणेचे उपसरपंच एस. के. पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. निवास पाटील, विश्वास शिंदे, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. सुनीता लव्हटे, सौ. गोकुळा पाटील, अशोक पाटील, किरणसिंह पाटील, एस. बी. पाटील, सदाशिव कांबळे, कु. स्वाती सावंत, शिवाजी चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास सौ. प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा वास्कर, ‘बिद्री’चे संचालक श्रीपती पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबासो चौगले, ‘शाहू’चे संचालक एम. आय. पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, वडकशिवालेचे सरपंच अमर पारळे, चुयेच्या सरपंच निर्मला गुरव, उचगावच्या सरपंच सुरेखा चौगले, पंचायत समिती सदस्या सुवर्णा बोटे, शशिकांत तिवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडीचा प्रचार करावा
लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा मनापासून प्रचार केला. त्यांचा आदेश मानून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनीही आघाडीच्या उमेदवाराचाच प्रचार केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना प्रमाणिकपणाने मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांनी केले.

Web Title: Give the opportunity of hatrick: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.