संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या  : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 08:04 PM2021-05-21T20:04:44+5:302021-05-21T20:06:17+5:30

CoronaVirus Kolhapur : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केल्या.

Give priority to institutional segregation: Collector Daulat Desai | संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या  : जिल्हाधिकारी दौलत देसाई

संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या  : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Next
ठळक मुद्देसंस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या  : जिल्हाधिकारी दौलत देसाईग्रामसमित्या, अधिकाऱ्यांना सुचना

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केल्या.

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही दोन पॉझीटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेलीच आहे. शिवाय मृत्यूदरदेखील जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसबंधी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सकाळी दुरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामसमित्या, सरपंच, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.

ते म्हणाले, आपले गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी प्रत्येक गावकऱ्याने योगदान द्यावे, मागीलवर्षीप्रमाणे आतादेखील ग्रामसमित्यांनी सक्रियपणे काम करावे. पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात राहिल्याने त्यांच्यामुळे कुटूंबियांना संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, याठिकाणी औषधे व सोयीसुविधा पुरवा, त्यासाठी ग्राम दक्षता समितीच्यामाध्यमातून निधीची तरतूद करा किंवा गावातील दानशूर व्यक्तींची मदत घ्या, तपासण्यांचे प्रमाण वाढवा, ६० वर्षावरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, त्यांचे स्वतंत्र नियोजन करा, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. डॉ. योगेश साळे यांनी कोरोना सध्यस्थितीचा आढावा घेतला.

Web Title: Give priority to institutional segregation: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.