नागरी बँकांच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:21+5:302021-03-28T04:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोराेनाचे संकट पुन्हा गडद होत असून, त्याला तोंड देण्यासाठी नागरी बँकांच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोराेनाचे संकट पुन्हा गडद होत असून, त्याला तोंड देण्यासाठी नागरी बँकांच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण द्यावे, असा ठराव कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे होते. चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीमुळे बँकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने नवीन ‘बी. आर.’ कायद्यामुळे बँकांना अडचणीचे ठरणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही सभेत झाला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी केले. उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी यांनी आभार मानले. यावेळी संचालक सूर्यकांत पाटील, विठ्ठल मोरे, शिरीष कणेरकर, दत्तात्रय राऊत, मधुसूदन सावंत, दत्ताजीराव इंगवले, प्रशांत गंभीर, दीपक फडणवीस आदी उपस्थित होेते.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या ऑनलाईन सभेत अध्यक्ष निपुण कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश धर्माधिकारी, अनिल नागराळे उपस्थित होते. (फोटो-२७०३२०२१-कोल-नागरी बॅक)