शिंगणापूरातील मंजूर प्रभागातील प्रॉपटी कार्ड नागरिकांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:35 PM2021-02-09T17:35:48+5:302021-02-09T17:38:10+5:30
collector Kolhapur- शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना वाढीव गावठाण प्रॉपटी कार्ड द्यावे या मागणी करिता वाढीव गावठाण हक्क कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना वाढीव गावठाण प्रॉपटी कार्ड द्यावे या मागणी करिता वाढीव गावठाण हक्क कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
शिंगणापूर ग्रामपंचायतीची स्थापना १९५२ साली झाली आहे. सन १९६९ साली गावचा सिटी सर्व्हे झाला आहे. तेव्हापासून आजतागयत मूळ गावठाण जैसे थे आहे. या कालावधीत शिंगणापूर गावाची लोकसंख्या वाढली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने अद्यापही वाढीव गावठाणचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना प्रॉपटी कार्ड मिळालेली नाहीत.
येथील नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, घरकुल योजनासह सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्रामपंचायतीचे करही भरून घेतला जात आहे. मात्र, प्रॉपटी कार्ड काही अजून झालेले नाही. आंदोलनात दत्तात्रय पोवार, दगडू संकपाळ, दीपक पोवार, दत्ता आवळे, सागर आवळे, संदीप आवळे, बाळासाहेब कांबळे, विजय कांबळे, तुषार कांबळे, आदी उपस्थित होते.