रास्त भाव द्या, अन्यथा ‘शाहू’ची बाजारपेठ बंद पडेल

By admin | Published: October 5, 2016 12:17 AM2016-10-05T00:17:26+5:302016-10-05T00:38:12+5:30

गूळ उत्पादकांचा इशारा : बैठकीत बॉक्स, सौदे यावर जोरदार चर्चा

Give the right price, otherwise the market of Shahu will be closed | रास्त भाव द्या, अन्यथा ‘शाहू’ची बाजारपेठ बंद पडेल

रास्त भाव द्या, अन्यथा ‘शाहू’ची बाजारपेठ बंद पडेल

Next

कोल्हापूर : साखरेच्या दराशी तुलना करून गुळाचा दर ठरवता, यंदा साखरेचे दर चांगले असल्याने किमान ऊसदराच्या तुलनेत भाव मिळावा, अशी मागणी करत रास्त भाव दिला नाही तर राजर्षी शाहूंनी वसवलेली बाजारपेठ बंद पडण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा गूळ उत्पादकांनी बैठकीत दिला. मंगळवारी बाजार समितीत गूळ उत्पादक, अडते, व्यापारी, हमालांची बैठक आयोजित केली होती. यावेळी गूळ बॉक्स, शंभर टक्के वजन, सौदे आदी विषयांवर बैठकीत जोरदार चर्चा झाली.
व्यापारी साखरेचे दर पडले की गुळाचे दर पाडतात. या हंगामात साखर ३६ रुपयांच्या पुढे असल्याने चांगला भाव मिळण्यात अडचण नसल्याचे सांगत हमीभाव द्यावा, अशी मागणी भीमराव गानुगडे यांनी केली. कायद्याने हमीभाव देता येत नसल्याचे सदानंद कोरगांवकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठीच कायदा बदलत नाही का? असा सवाल करत अगोदरच अनिश्चित दरामुळे निम्याहून अधिक गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत, रास्त भाव मिळाला नाही तर बाजारपेठ बंद पडण्यास वेळ लागणार नसल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले. त्यावर हमीभावाबाबत सरकारच्या पातळीवर प्रयत्न करतो, असे भगवान काटे यांनी सांगितले. बाहेरील गूळ ‘कोल्हापुरी’ नावाने विकला जात आहे, पैसे बुडवून गेलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, अशा मागण्या करण्यात आल्या. नीलेश पटेल, रंगराव पाटील, संजय पाटील, विक्रम खाडे यांनी चर्चेत भाग घेतला. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती विलास साठे, कृष्णात पाटील, नंदकुमार वळंजू, नेताजी पाटील, संजय जाधव, परशराम खुडे आदी उपस्थित होते.

सौद्यावेळी चप्पल बंद करा !
सौद्यात चप्पल घालून गुळाच्या थप्पीवर चढतात. हे चित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले तर ‘कोल्हापुरी’ गुळाची नाचक्की होईल. यासाठी चप्पल बंदी करा, अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली.


सौद्यावेळी चप्पल बंद करा !
सौद्यात चप्पल घालून गुळाच्या थप्पीवर चढतात. हे चित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले तर ‘कोल्हापुरी’ गुळाची नाचक्की होईल. यासाठी चप्पल बंदी करा, अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली.
गूळ महोत्सव सुरू करा
मार्केटिंग नसल्याने ‘कोल्हापुरी गूळ’ मागे पडल्याचे सांगत पुणे, मुंबई येथे गूळ महोत्सवाचे आयोजन करावे, गूळ मार्केटमधील रस्ते धूळमुक्त करा, अशी सूचना संचालक संजय जाधव यांनी केली.

Web Title: Give the right price, otherwise the market of Shahu will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.