सुरक्षारक्षकांची माहिती पोलीस ठाण्यांना द्या : संजय मोहिते -बँक, ए.टी.एम. सेंटरच्या कोल्हापूर प्रतिनिधींची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:24 PM2017-12-08T21:24:09+5:302017-12-08T21:30:36+5:30

कोल्हापूर : सुरक्षारक्षकांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, ए.टी.एम. सेंटरसाठी ठिकाण निश्चित करताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी

 Give security information to the police station: Sanjay Mohite - Bank, ATM. The presence of Kolhapur representatives of the Center | सुरक्षारक्षकांची माहिती पोलीस ठाण्यांना द्या : संजय मोहिते -बँक, ए.टी.एम. सेंटरच्या कोल्हापूर प्रतिनिधींची उपस्थिती

सुरक्षारक्षकांची माहिती पोलीस ठाण्यांना द्या : संजय मोहिते -बँक, ए.टी.एम. सेंटरच्या कोल्हापूर प्रतिनिधींची उपस्थिती

Next

कोल्हापूर : सुरक्षारक्षकांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, ए.टी.एम. सेंटरसाठी ठिकाण निश्चित करताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिल्या.ते कसबा बावड्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बँक व ए.टी.एम. सेंटर सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहितेव्यवस्थेबाबतच्या बैठकीत बोलत होते.जिल्यातील बँक व ए.टी.एम. सेंटरवर दिवसा व रात्री दरोडा, जबरी चोरी, चोरीच्या गुन्'ांना प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मोहिते यांनी राष्ट्रीयीकृत बँका व ए. टी. एम. सेंटरवर सुरक्षा पुरविणाऱ्या खासगी एजन्सीचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रतिनिधींना यावेळी मार्गदर्शन केले.संजय मोहिते म्हणाले, बँक व ए.टी.एम. सेंटरच्या सुरक्षेकरिता सुरक्षारक्षक नेमणे, नाईट व्हिजनचे उच्च क्षमतेचे सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविणे, जनरेटर बसवून बॅकअप ठेवणे, भरपूर विद्युतप्रकाशाची व्यवस्था करणे, आॅटोमॅटिक व मोठ्या आवाजातील सायरन बसविणे, पैसे भरणा करण्यासाठी स्ट्राँग कॅश व्हॅन हत्यारधारी सुरक्षेसह अद्ययावत ठेवणे, पैसे भरणा करण्यासाठी ठेका घेतलेल्या कंपनीच्या इसमांकडून गोपनीय कोडचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणे.
त्याचबरोबर ए.टी.एम. सेंटरवरील रक्षकांकडे पोलीस ठाणे व नियंत्रण शाखेचा नंबर असल्याबाबतचा खात्री करण्याच्या सूचना मोहिते यांनी दिल्या. खासगी सुरक्षा एजन्सींनी सुरक्षारक्षक नियुक्त करताना त्यांची चारित्र्य पडताळणी करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना नोकरीवर ठेवू नये, सुरक्षारक्षकांचे दूरध्वनी क्रमांक, संपूर्ण पत्ता-छायाचित्रासह स्थानिक पोलीस ठाण्याकडे द्यावा, सुरक्षारक्षकांकडे पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन नंबर देऊन त्यांच्याकडे मोबाईल असल्याची खात्री करावी. सुरक्षारक्षक विशेष प्रशिक्षण घेतलेले व कार्यक्षम असावेत, वयस्कर सुरक्षा नेमू नयेत, अशा सूचना दिल्या.

कोल्हापूर जिल्'ातील बँका व ए.टी.एम. सेंटर सुरक्षा व्यवस्थेबाबत शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बैठक घेऊन व्यवस्थापक, प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. यावेळी समोर उपस्थित प्रतिनिधी.

 

Web Title:  Give security information to the police station: Sanjay Mohite - Bank, ATM. The presence of Kolhapur representatives of the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.